स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक  //  सर्व शिक्षकांनी टीईटीसह अध्यापनात अद्ययावत राहावे : राजगोपाल भंडारी  //  कोडीद येथे विभागीय आयुक्तांचा ग्रामसंवाद; योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना  //  शिरपूर शहरात बेवारस अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान

शिरपूर, प्रतिनिधी : शहरातील भंडारी टाकी परिसरात रविवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत फळांचे गोदाम आणि व्यापाऱ्याचा संसार जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारी टाकी परिसरातील ‘हिंदुस्तान फ्रुट’ या फळांच्या गोदामाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात सापडले. गोदामात साठवून ठेवलेले केळीचे सुमारे ८० ते १०० कॅरेट, एक बर्गमन दुचाकी तसेच व्यापारी अश्फाक बागवान यांच्या कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.


घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरून आणखी मोठी दुर्घटना टळली.
या आगीत व्यापारी अश्फाक बागवान यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!