अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक  //  सर्व शिक्षकांनी टीईटीसह अध्यापनात अद्ययावत राहावे : राजगोपाल भंडारी  //  कोडीद येथे विभागीय आयुक्तांचा ग्रामसंवाद; योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना  //  शिरपूर शहरात बेवारस अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन  //  सावेरजवळ ट्रक उलटून भीषण आग; वाहतूक ठप्प  //  पिक विमा योजनेचा लाभ घ्या; शेतकऱ्यांना आमदार पटेल-पावरा यांचे आवाहन  //  शिंगावे येथे घरात घुसून दाम्पत्याला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई

शिरपूर : शहरातील शिंगावे शिवारातील फुलेनगर मधून झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेत २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण ममन ठाकूर (वय ४५, रा. फुलेनगर, शिंगावे शिवार) यांच्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता.यामध्ये एमआय कंपनीचा ४३ इंची एलईडी टीव्ही व रियलमी कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल असा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना डी.बी.पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगदरम्यान शहरातील भुपेशनगर परिसरात संशयित इको वाहन दिसले. वाहनातील तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.अधिक चौकशीत जयेश संजय धनगर (वय २१), मुकेश किशोर पाटील (वय २२) आणि आकाश उर्फ ऋतिक चंदू माळी (वय २२) या तिघांनी घरफोडीची कबुली दिली.
संशयितांकडून एमआय कंपनीचा ४३ इंची एलईडी टीव्ही, रियलमी कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे इको वाहन असा एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल,अतुल पाटील, सचिन वाघ,विनोद आखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे,मनोज महाजन,सोमा ठाकरे,आरीफ तडवी,मनोज दाभाडे,प्रशांत पवार,भटु साळुंके तसेच स्था.गु.शा.धुळे येथील पोहेकॉ अमोल पाटील अशांनी मिळून केली आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!