हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन

शिरपूर : एस.व्ही.के.एम.च्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) शिरपूर कॅम्पसच्या केंद्रीय ग्रंथालयातर्फे आणि थायलंडमधील खोन केन विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ जून रोजी ‘इंटरनॅशनल लायब्ररी सिम्पोजियम ऑन नॉलेज अँड कम्युनिकेशन (ILSKCOM–2026)’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मुक्त ज्ञानप्रवेशाद्वारे शाश्वत ग्रंथालय विकास’ या विषयावर झालेल्या परिसंवादात देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक आणि ग्रंथालय क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई यांच्या हस्ते झाले. यावेळी राजगोपाल भंडारी, कॅम्पस प्रभारी रिता पटेल आणि संचालिका डॉ. सुनीता पाटील उपस्थित होत्या.
उद्घाटनपर भाषणात प्रा. पिल्लई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथालयांची विश्वासार्ह ज्ञानसंस्था म्हणून असलेली भूमिका अधोरेखित केली. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. महेंद्र प्रताप सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मुक्त ज्ञानप्रवेशामुळे ग्रंथालय सेवांमध्ये होत असलेल्या बदलांवर भाष्य करताना तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये जपण्याची गरज व्यक्त केली.
परिसंवादात भारतासह थायलंड, अमेरिका आदी देशांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. एकूण ३०५ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला, तर १३५ संशोधन निबंधांचे विविध तांत्रिक सत्रांत सादरीकरण झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, ज्ञान व्यवस्थापन, माहितीप्रवेश, ग्रंथालय नवोन्मेष आणि शाश्वत विकास या विषयांवर सखोल चर्चा झाली.
संचालिका डॉ. सुनीता पाटील यांनी संस्थेच्या संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक शैक्षणिक सहकार्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल, राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनासह प्रशासकीय अधिकारी शिवाजी गायकवाड, उपग्रंथपाल व समन्वयक डॉ. रवींद्र मेंढे आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसंवादाचा समारोप जागतिक सहकार्य, मुक्त ज्ञानप्रवेश आणि सर्वसमावेशक ज्ञानव्यवस्था उभारण्याच्या निर्धाराने झाला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!