हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

. खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन

शिरपूर : येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते, मुंबई येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळचे माजी अध्यक्ष, माजी खासदार स्व. मुकेशभाई रसिकलाल पटेल यांच्या 24 व्या स्मृतीदिना निमित्त 15 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता आर. सी. पटेल मेन बिल्डींग मधील “राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल” मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व अनेक नागरिकांसह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. मुकेशभाई पटेल यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

शिरपूर शहर व तालुक्याच्या विकासाचगाथा मांडतांना स्व. मुकेशभाई पटेल यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि समाजसेवेच्या माध्यमातून शिक्षण, उद्योग, सामाजिक विकास आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याचा ठसा आजही शिरपूरच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर उमटलेला दिसून येतो. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. मुकेशभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून गुलाबपुष्प वाहत अभिवादन केले. सभागृहात ‘हे राम’ या भजनाच्या सुरेल स्वरांनी वातावरण भारावून गेले होते. धार्मिक व भावनिक वातावरणात उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून स्व. मुकेशभाई पटेल यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी खासदार स्वर्गीय मुकेशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल या त्रिरत्नांनी शिरपूर शहर व तालुक्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. या तिघांनी विकासाचे नवे आयाम निर्माण करत शिरपूरला राज्याच्या विकासाच्या नकाशावर विशेष स्थान मिळवून दिले. स्व. मुकेशभाई पटेल यांचे अकाली आणि अचानक एक्झिट हा शिरपूरसाठी मोठा धक्का होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही सर्वांना जाणवत असल्याच्या भावना आजही व्यक्त होतात.कार्यक्रमाला आ. काशिराम दादा पावरा, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, खजिनदार बबनलाल अग्रवाल, संस्थेच्या सचिव सौ. रेशा पटेल, सर्व संचालक, कमलकिशोर भंडारी, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, उपनगराध्यक्षा सौ. संगिता देवरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर पिपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, संचालक अतुल भंडारी, संचालक विजय भंडारी, संचालक विजय अग्रवाल, कैलासचंद्र अग्रवाल, सुभाष कुलकर्णी, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, अनेक गावांचे सरपंच, नगरसेवक, नगरसेविका, शहर व तालुक्यातील नागरिक, अनेक पदाधिकारी, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या विविध शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनीही गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.

भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात स्व. मुकेशभाई पटेल यांच्या कार्याविषयीचा आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ केली. त्यांच्या स्मृती समाजाच्या विकास कार्याला कायम प्रेरणा देत राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.प्रास्ताविक व सूत्रसंचलन मुख्याध्यापक विवेकानंद ठाकरे यांनी केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!