हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन

शिरपूर (प्रतिनिधी) : श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे मुख्य आश्रयदाते, उद्योगपती तथा माजी खासदार स्व. मुकेशभाई रसिकलाल पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवार, दि.१५ जून २०२६ रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी ९.३० ते ९.५० या वेळेत आर. सी. पटेल मेन बिल्डिंगमधील ‘राजगोपाल चंदूलाल भंडारी हॉल’ येथे आयोजित करण्यात आला असून, स्व. मुकेशभाई पटेल यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
स्व. मुकेशभाई पटेल हे उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तसेच शिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे गटनेते भूपेशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!