हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

शिरपूर (प्रतिनिधी ) शिरपूर तालुक्यातील अर्थे बु. गावातील शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना शनिवारी १३ जून रोजी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, शेतीवरील आर्थिक ताणामुळेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
मयत शेतकऱ्याचे नाव दिगंबर अवधूत कुलकर्णी (वय ४४, रा. अर्थे बु., ता. शिरपूर) असे आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच गावचे माजी सरपंच साहेबराव पाटील तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने खाली उतरवून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय यांनी दिलेल्या खबरीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,पुढील तपास पोहेकॉ गिरासे करीत आहे.
दिगंबर कुलकर्णी हे शेतीसोबतच पूजाविधी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शेतीवरील कर्जबाजारीपणामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तथापि, आत्महत्येमागील नेमके कारण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!