हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर, प्रतिनिधी : तालुक्यातील होळनाथे येथील एका व्यावसायिकाची अनोळखी मोबाईल कॉलद्वारे तब्बल ९९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
होळनाथे येथील आधार सेवा केंद्र चालक नरेंद्र फत्तेसिंग जाधव यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला होता. त्यांनी कॉल स्वीकारल्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार रुपये परस्पर वळते झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला. कोणतीही वैयक्तिक माहिती अथवा ओटीपी न देता खात्यातील रक्कम गायब झाल्याने जाधव यांनी तातडीने थाळनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अनोळखी कॉल, संशयास्पद लिंक किंवा अॅप्सबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस व सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

IMG_20260613_22522451

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!