हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च उपक्रम; 350 हून अधिक खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या तालुकास्तरीय टॅलेंट सर्च मोहिमेला खेळाडू व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिरपूर येथील यशस्वी आयोजनानंतर बुधवारी (ता. 10) धुळे शहरातील एस.व्ही.के.एम. संस्थेच्या मैदानावर मोहिमेचा दुसरा टप्पा उत्साहात पार पडला.
जिल्हाभरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील नैसर्गिक कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने ही निवड मोहीम राबविण्यात येत आहे. धुळे तालुक्यातून सुमारे 350 खेळाडूंनी नोंदणी करून सहभाग नोंदविला.
यावेळी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार प्रकाश पाटील, उपाध्यक्ष विक्रम राठोड, सहसचिव प्रा. सतीश मराठे, दबीर शेख, सदस्य अरविंद किल्लेदार, नरेंद्र काळमेख तसेच निवड समितीचे सदस्य लहू पाटील (ज्युनिअर), राजेंद्र बारे आणि महिला निवड समितीच्या अध्यक्षा भावना चौरसिया उपस्थित होत्या.
पहिल्या दिवशी 14 वर्षांखालील व 16 वर्षांखालील गटातील खेळाडूंच्या निवड चाचण्या घेण्यात आल्या. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, शारीरिक तंदुरुस्ती तसेच खेळावरील आकलन व कौशल्य यांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. अनुभवी निवडकर्त्यांनी प्रत्येक खेळाडूची स्वतंत्र पाहणी करून त्यांची गुणवत्ता तपासली.
मोहिमेच्या पुढील टप्प्यात गुरुवारी (ता. 11) 19 वर्षांखालील, 23 वर्षांखालील, खुला गट तसेच महिला खेळाडूंसाठी निवड चाचण्या होणार आहेत. निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारे राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, धुळेनंतर पुढील टप्प्यात 13 जून रोजी दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूलमध्ये टॅलेंट सर्च मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी धुळे तालुक्यातून मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!