हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आमोदे शिवारात सापाचा दंश; युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत

शिरपूर : तालुक्यातील आमोदे शिवारात सर्पदंश झालेल्या 30 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत युवकाचे नाव कमल काळू पावरा (वय 30, रा. खंबाळे, ता. शिरपूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या दरम्यान आमोदे शिवारातील महामार्गावरील एस्सार पेट्रोल पंपाजवळ असताना त्यांना सापाने दंश केला. घटनेनंतर त्यांना तातडीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र प्रकृती गंभीर होत गेल्याने अखेर मंगळवारी (9 जून) सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पावरा यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय लेखन गुशिंगे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ कुंदन करीत आहेत.
दरम्यान, सर्पदंशामुळे एका तरुणाचा झालेला मृत्यू ही घटना परिसरासाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली असून नागरिकांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!