कृषी विभाग-पोलिसांची संयुक्त कारवाई;वाघाडी येथे एचटीबीटी बियाणे जप्त  //  भरड धान्य मोजणीसाठी लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात  //  बारडोलीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ७ ठार, ३८ जखमी  //  जैतपूरमधील अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; स्थगितीची मागणी, आंदोलनाचा इशारा  //  शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणात व्यवस्थापक कुलकर्णीना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  //  पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीविरोधात सीपीआय व किसान सभेचे धरणे आंदोलन; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन  //  शहरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह,पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन  //  महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत तरुणांचा कोळी समाजातर्फे सत्कार  //  ग्रंथपाल दक्षा गिरासे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी

कृषी विभाग-पोलिसांची संयुक्त कारवाई;वाघाडी येथे एचटीबीटी बियाणे जप्त

शिरपूर : प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांची बेकायदेशीर विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 95 हजार 300 रुपयांचा बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) विशाल लक्ष्मण मोटे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनराज रामदास पाटील (रा. वाघाडी, ता. शिरपूर) व नरेंद्र बोरसे (ता. साक्री) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हा कृषी विभाग आणि शिरपूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता. 3) सायंकाळी वाघाडी येथील धनराज पाटील यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला. पथकाने ‘रुद्राक्षा’ व ‘रुद्रा प्रीमियम हायब्रीड कॉटन सीड्स बिग बॉल’ या जातींची 46 पाकिटे तसेच ‘ब्राझील एक्स्ट्रा’ या जातीची 16 पाकिटे अशी एकूण 62 पाकिटे जप्त केली.
तपासात संशयितांनी संगनमत करून भारतात प्रतिबंधित असलेली एचटीबीटी कापूस बियाणे कोणतीही परवानगी न घेता शेतकऱ्यांना विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे शासनाची तसेच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, बियाणे कायदा, बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री किंमत निर्धारण व विनियमन) कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!