धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी  //  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात १ जूनला शिरपुरात धरणे आंदोलन  //  भाजपच्या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद  //  जळोद आश्रमशाळेतील चोरीचा उलगडा;चोरीच्या वाहनासह दोन ताब्यात  //  शिंदखेडा पोलिसांकडून बेवारस वाहनांची यादी जाहीर; वाहनधारकांना संपर्काचे आवाहन  //  थाळनेर ग्रामसभेत शाळा एकत्रीकरण व पाणंद रस्त्यांचा मुद्दा गाजला  //  हायकोर्टाने दस्तऐवज रद्द ठरवल्यानंतरही कारवाई नाही; शिरपूर तहसीलदारांवर सवाल  //  आंबे-बोरमळी परिसरात नाला खोलीकरणाचा शुभारंभ ; शिरपूर पॅटर्नसाठी २०.९१ लाखांचा निधी  //  आर.सी.पटेल महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा; २८०० विद्यार्थ्यांची नोंदणी  //  शेतात काम करताना प्रकृती बिघडली; ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी

शिरपूर (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील क्रिकेटमधील सुप्त गुणवत्तेला व्यासपीठ मिळावे आणि जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे तालुकास्तरीय ‘टॅलेंट सर्च’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा आणि दोंडाईचा येथे हा उपक्रम राबविण्यात येणार असून सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक गुणवान क्रिकेटपटू असून त्यांना योग्य संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच तालुकास्तरावर जाऊन गुणवंत खेळाडूंचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवड झालेल्या खेळाडूंना वर्षभर तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात ८ व ९ जून,धुळे येथील एसव्हीकेएम शैक्षणिक संकुलात १० व ११ जून
दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूलमध्ये १३ जून,सिंदखेडा येथील व्ही.के.पाटील इंटरनॅशनल स्कूल येथें १४ जून आणि साक्रीत
तालुका क्रीडा संकुलामध्ये १६ व १७ जून याठिकाणी निवड चाचण्या होणार असून या टॅलेंट सर्चमध्ये केवळ धुळे जिल्ह्यातील मुले व मुली सहभागी होऊ शकणार आहेत. आधार कार्ड सादर करणे अनिवार्य राहणार आहे. सहभागासाठी ३ जूनपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.असून मुलांसाठी १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील आणि खुला गट ठेवण्यात आला आहे. तर मुलींसाठी १५ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील आणि खुला गट असणार आहे.
निवड झालेल्या क्रिकेटपटूंना जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत वर्षभर तंत्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच मुंबई व पुणे येथील अनुभवी आहारतज्ज्ञ, फिजिओलॉजिस्ट आणि फिटनेस प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही वेळोवेळी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे, एसव्हीकेएम शैक्षणिक संस्थेने ऑक्टोबर २०२५ पासून जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी कायमस्वरूपी मुख्य पुरुष प्रशिक्षक, सहाय्यक पुरुष प्रशिक्षक आणि सहाय्यक महिला प्रशिक्षकांची नियुक्ती केली असून त्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
अधिक माहितीसाठी समन्वयक संजय जगताप (मो. ९०७५९६९९१९) व पूजा जैन (मो. ९६०७५५१३०५) यांच्याशी तसेच धुळे येथील गरुड कॉम्प्लेक्समधील जिल्हा क्रिकेट असोसिएशन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा क्रिकेटपटूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!