शिंदखेडा पोलिसांकडून बेवारस वाहनांची यादी जाहीर; वाहनधारकांना संपर्काचे आवाहन  //  थाळनेर ग्रामसभेत शाळा एकत्रीकरण व पाणंद रस्त्यांचा मुद्दा गाजला  //  हायकोर्टाने दस्तऐवज रद्द ठरवल्यानंतरही कारवाई नाही; शिरपूर तहसीलदारांवर सवाल  //  आंबे-बोरमळी परिसरात नाला खोलीकरणाचा शुभारंभ ; शिरपूर पॅटर्नसाठी २०.९१ लाखांचा निधी  //  आर.सी.पटेल महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा; २८०० विद्यार्थ्यांची नोंदणी  //  शेतात काम करताना प्रकृती बिघडली; ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू  //  वनावलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी; २४ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा  //  थाळनेर-भोरटेक रस्त्यावर भीषण अपघात; तीन चाकी वाहनाखाली दबून तरुणाचा मृत्यू  //  मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा जल्लोष  //  “वीज द्या,पिके वाचवा”; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणला घेराव, महामार्गावर रस्ता रोको

शेतात काम करताना प्रकृती बिघडली; ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

शिरपूर : तालुक्यातील कुवा येथे शेतात काम करत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २८) घडली. सतीष गोकुळ गुजर (वय ४७, रा. कुवा, ता. शिरपूर, जि. धुळे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत शाम सुरेश गुजर यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीष गुजर हे बुधवारी सकाळी शेतात कामासाठी गेले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना अचानक उलटी होऊन प्रकृती बिघडली. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने तुकाराम महाराज यांच्या शेतातील झोपडीकडे धाव घेतली. तेव्हा सतीष गुजर हे खाटेवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले.यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी वाहनाने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉ. अमोल जैन यांनी सकाळी ११ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे कुवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोहेकॉ प्रेमसिंग गिरासे करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!