
शिंदखेडा : शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे बऱ्याच कालावधीपासून विविध प्रकारची बेवारस वाहने जमा असून, संबंधित वाहनमालकांनी आवश्यक कागदपत्रांसह वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन शिंदखेडा पोलिसांनी केले आहे.
पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक दुचाकी तसेच इतर वाहने बेवारस अवस्थेत उभी असून, त्यामध्ये हिरो होंडा, बजाज, होंडा अॅक्टिव्हा, मारुती सुझुकी स्विफ्ट, महिंद्रा मॅक्स आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे पासिंग क्रमांक, चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकासह संपूर्ण यादी पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे.
वाहनधारकांनी वाहनासंबंधी मालकीचे पुरावे व आवश्यक कागदपत्रे घेऊन शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक 02566-222233 तसेच पोलीस हवालदार हेमराज जाधव (मो. 8108599884) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर प्रेस नोट प्रसिद्धीसाठी देण्यात आली असून, वाहनमालकांनी लवकरात लवकर पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
