पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात १ जूनला शिरपुरात धरणे आंदोलन  //  भाजपच्या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद  //  जळोद आश्रमशाळेतील चोरीचा उलगडा;चोरीच्या वाहनासह दोन ताब्यात  //  शिंदखेडा पोलिसांकडून बेवारस वाहनांची यादी जाहीर; वाहनधारकांना संपर्काचे आवाहन  //  थाळनेर ग्रामसभेत शाळा एकत्रीकरण व पाणंद रस्त्यांचा मुद्दा गाजला  //  हायकोर्टाने दस्तऐवज रद्द ठरवल्यानंतरही कारवाई नाही; शिरपूर तहसीलदारांवर सवाल  //  आंबे-बोरमळी परिसरात नाला खोलीकरणाचा शुभारंभ ; शिरपूर पॅटर्नसाठी २०.९१ लाखांचा निधी  //  आर.सी.पटेल महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा; २८०० विद्यार्थ्यांची नोंदणी  //  शेतात काम करताना प्रकृती बिघडली; ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू  //  वनावलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी; २४ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात १ जूनला शिरपुरात धरणे आंदोलन

शिरपूर : पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस आणि सीएनजीच्या वाढत्या दरांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवार, १ जून रोजी शिरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर दुपारी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
संघटनेच्या निवेदनानुसार, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन आणि गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला असून ट्रॅक्टर व कृषी यंत्रसामग्री चालविणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. परिणामी शेतीच्या कामांवरही परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
किसान सभेने केंद्र सरकारवर पेट्रोल, डिझेल, गॅस व सीएनजीच्या पुरवठ्याबाबत कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढीचे धोरण राबविल्याचा आरोप केला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावत असून घरगुती खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण झाले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दरवाढ तात्काळ मागे घेऊन पेट्रोल, डिझेल, गॅस आणि सीएनजीचे दर पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. चार राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देशातील आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सध्याची परिस्थिती त्याच्या विपरीत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यभर आंदोलनाची हाक भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिल आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्य कौन्सिलने १ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिरपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनांनी केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!