भरड धान्य मोजणीसाठी लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात  //  बारडोलीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ७ ठार, ३८ जखमी  //  जैतपूरमधील अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; स्थगितीची मागणी, आंदोलनाचा इशारा  //  शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणात व्यवस्थापक कुलकर्णीना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  //  पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीविरोधात सीपीआय व किसान सभेचे धरणे आंदोलन; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन  //  शहरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह,पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन  //  महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत तरुणांचा कोळी समाजातर्फे सत्कार  //  ग्रंथपाल दक्षा गिरासे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी  //  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात १ जूनला शिरपुरात धरणे आंदोलन

बारडोलीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ७ ठार, ३८ जखमी

बारडोली/धुळे : गुजरातमधील सुरतजवळ बारडोली-उवा महामार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसची समोरासमोर धडक होऊन सात जणांचा मृत्यू झाला, तर ३८ प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन्ही बसचालकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे आगाराची सुरत-धुळे बस (एमएच-१८ बीझेड-१२५८) बारडोली महामार्गावरून जात असताना पुढे पलटी झालेल्या टँकरला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला. भरधाव बसने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर प्रवेश केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या जामनेर आगाराच्या जामनेर-सुरत बसला (एमएच-२० बीएल-३३९०) जोरदार धडक बसली.


धडकेनंतर जामनेर आगाराच्या सीएनजी बसने पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. त्यामुळे काही प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत धुळे आगाराचे चालक व्ही. एम. पाटील व जामनेर आगाराचे चालक घनश्याम राघो बरकले यांच्यासह एकूण सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
अपघातात वाहक एच. एच. पवार, सोपान क्षीरसागर यांच्यासह ३८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि बारडोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबविले. आगीवर नियंत्रण मिळवून जखमींना विविध रुग्णालयांत हलविण्यात आले.
जखमींपैकी १९ जणांवर बारडोली सिव्हिल हॉस्पिटल, ५ जणांवर सुरत सिव्हिल हॉस्पिटल, ८ जणांवर सरदार हॉस्पिटल आणि ६ जणांवर ओम साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!