भरड धान्य मोजणीसाठी लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात  //  बारडोलीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ७ ठार, ३८ जखमी  //  जैतपूरमधील अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; स्थगितीची मागणी, आंदोलनाचा इशारा  //  शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणात व्यवस्थापक कुलकर्णीना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  //  पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीविरोधात सीपीआय व किसान सभेचे धरणे आंदोलन; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन  //  शहरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह,पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन  //  महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत तरुणांचा कोळी समाजातर्फे सत्कार  //  ग्रंथपाल दक्षा गिरासे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी  //  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात १ जूनला शिरपुरात धरणे आंदोलन

शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणात व्यवस्थापक कुलकर्णीना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेडमधील कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य संशयिताला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.तब्बल १३ कोटी ७५ लाख ७६ हजार २५३ रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या या गाजलेल्या प्रकरणात ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२५ रोजी बँकेच्या लेखापरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ४६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फसवणूक, अपहार, विश्वासघात यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपासादरम्यान बँकेचे अधिकारी, कर्मचारी, चेअरमन तसेच कर्जदार अशा एकूण ४६ आरोपींनी संगनमत करून बँकेच्या सभासद व ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. संशयितांनी मिळून १३ कोटी ७५ लाख ७६ हजार ३५६ हजार रुपयांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच अनेक संशयित फरार झाले होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक तथा आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान,संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. मात्र न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले.आर्थिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत असताना १ जून २०२६ रोजी या प्रकरणातील मुख्य संशयित बँकेचे व्यवस्थापक संजय केशवराव कुलकर्णी वय ५६ याला शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल देवडे, पोलीस निरीक्षक सविता गवांदे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.
या अटकेमुळे शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार असून, उर्वरित आरोपींच्या शोधासाठीही आर्थिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!