भरड धान्य मोजणीसाठी लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात  //  बारडोलीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ७ ठार, ३८ जखमी  //  जैतपूरमधील अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; स्थगितीची मागणी, आंदोलनाचा इशारा  //  शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणात व्यवस्थापक कुलकर्णीना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  //  पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीविरोधात सीपीआय व किसान सभेचे धरणे आंदोलन; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन  //  शहरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह,पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन  //  महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत तरुणांचा कोळी समाजातर्फे सत्कार  //  ग्रंथपाल दक्षा गिरासे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी  //  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात १ जूनला शिरपुरात धरणे आंदोलन

भरड धान्य मोजणीसाठी लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

धुळे : आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या ज्वारीची मोजणी करून मालाचा दर्जा चांगला दाखविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता. ३) धुळे येथील शासकीय गोदामात करण्यात आली.मनिष महेश बागुल (वय ३०, रा. साईछत्र अपार्टमेंट, आरटीओ कार्यालयाजवळ, पेठ रोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो धुळे तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी व त्यांच्या पत्नी यांनी शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. ज्वारीची मोजणी करण्यासाठी ते ३ जून रोजी धुळे येथील शासकीय गोदामात आले असता, संबंधित मालाचा दर्जा चांगला दाखवून मोजणी करण्यासाठी मनिष बागुल यांनी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तसेच लाच न दिल्यास ऑनलाइन बिल दाखविणार नसल्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
याबाबत शेतकऱ्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून मनिष बागुल याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैदाणे, सागर माळी व सुधीर मोरे यांच्या पथकाने केली. प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!