शिंदखेडा पोलिसांकडून बेवारस वाहनांची यादी जाहीर; वाहनधारकांना संपर्काचे आवाहन  //  थाळनेर ग्रामसभेत शाळा एकत्रीकरण व पाणंद रस्त्यांचा मुद्दा गाजला  //  हायकोर्टाने दस्तऐवज रद्द ठरवल्यानंतरही कारवाई नाही; शिरपूर तहसीलदारांवर सवाल  //  आंबे-बोरमळी परिसरात नाला खोलीकरणाचा शुभारंभ ; शिरपूर पॅटर्नसाठी २०.९१ लाखांचा निधी  //  आर.सी.पटेल महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा; २८०० विद्यार्थ्यांची नोंदणी  //  शेतात काम करताना प्रकृती बिघडली; ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू  //  वनावलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी; २४ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा  //  थाळनेर-भोरटेक रस्त्यावर भीषण अपघात; तीन चाकी वाहनाखाली दबून तरुणाचा मृत्यू  //  मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा जल्लोष  //  “वीज द्या,पिके वाचवा”; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणला घेराव, महामार्गावर रस्ता रोको

वनावलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी; २४ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

शिरपूर : तालुक्यातील वनावल येथे गाडी जवळ खेळण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांतील युवकांमध्ये बुधवारी (दि. २७ मे) रात्री जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्यानंतर पोलिसांनी तब्बल २४ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदविला आहे.
या हाणामारीदरम्यान दोन्ही गटांकडून लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याने अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये मुकेश कोळी, विशाल कोळी, शरीफ गिरासे यांच्यासह अन्य काही युवकांचा समावेश असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
“गाडीजवळ खेळणाऱ्या मुलांना का बोलता?” असा जाब विचारल्याने वादाला सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. किरकोळ वादातून दोन गट आमनेसामने येत परिस्थिती चिघळल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला.
याप्रकरणी वनावल येथील गोकुळ शाना कोळी व आरीफ नजीर गिरासे यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटांतील पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेचा पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे व पीएसआय सुरेश सोनवणे करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!