हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

१५ मेपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध,तालुका वाशीयांना जनगणना स्वयं-नोंदणीचे आवाहन

शिरपूर : भारत सरकारच्या आगामी जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यंदाच्या जनगणनेत नागरिकांसाठी “स्वयं-नोंदणी” (Self Enumeration) ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती नोंदविता येणार आहे.
तहसीलदार तथा चार्ज अधिकारी महेंद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ऑनलाइन स्वयं-नोंदणी प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती अचूक व सत्य स्वरूपात भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून जनगणना प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणतीही चुकीची अथवा अपूर्ण माहिती न भरता जबाबदारीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
“देशाच्या विकासासाठी अचूक जनगणना अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयं-नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी,” असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!