१५ मेपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध,तालुका वाशीयांना जनगणना स्वयं-नोंदणीचे आवाहन  //  समितीच्या कामाचा अहवाल जाहीर करा; बंजारा समाजाची मागणी  //  तालुक्यातील तरडीजवळ सोयाबीन ट्रक पलटी; चालक बचावला  //  खत वितरणात गैरप्रकार सहन केला जाणार नाही:-विशाल मोटे,नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना  //  अण्णाबाबांच्या विचारांना क्रीडा-कलेतून अभिवादन; उन्हाळी शिबिराचा दिमाखदार समारोप  //  प्रतिकूलतेवर मात; अविनाश पावरा ‘सुपर लीग’साठी निवड  //  शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी

समितीच्या कामाचा अहवाल जाहीर करा; बंजारा समाजाची मागणी

शिरपूर : बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीच्या कामाची सद्यस्थिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन उभारण्यात आले होते. त्यानंतर शासनाने समाजाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत समितीचे काम कुठपर्यंत पोहोचले, कोणत्या हालचाली सुरू आहेत, याबाबत समाजाला कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
शासनाकडून समाजाची दिशाभूल होत असल्याची भावना बंजारा समाजामध्ये निर्माण झाली असून समितीच्या कामाचा अहवाल आणि सद्यस्थिती तातडीने जाहीर करावी, अशी मागणी राज्यभर तहसील कार्यालयांमध्ये निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शिरपूर तहसील कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ समाजबांधव बन्सीलाल प्रताप बंजारा, शिवानंद बाबू बंजारा, कैलास अशोक बंजारा, जयराम सरावन चव्हाण (गोरसेना बंजारा तालुकाध्यक्ष), योगेश भाईदास बंजारा, मंगेश रणसिंग बंजारा, शांताराम बंजारा, विकास बंजारा, पृथ्वीराज बंजारा, श्रावण भूरा बंजारा, बिंदास राठोड, अत्तरसिंग बंजारा, दुबा बंजारा, मोतीलाल बंजारा, जगदीश बंजारा, राहुल बंजारा, दीपक बंजारा तसेच गोरसेना धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र राठोड आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!