हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अण्णाबाबांच्या विचारांना क्रीडा-कलेतून अभिवादन; उन्हाळी शिबिराचा दिमाखदार समारोप

शिरपूर : किसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे आयोजित उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिर २०२६ चा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थापक अध्यक्ष व स्वातंत्र्यसैनिक कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
समारोप सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पावरा, माजी प्राचार्य बी.डी. पाटील, माजी सरपंच अनिल गुजर, क्रीडा सल्लागार डॉ. लिंबाजी प्रताळे, क्रीडा संचालक डॉ. तेजस शर्मा, उपप्राचार्य विवेक पाटील यांच्यासह पालक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. लिंबाजी प्रताळे यांनी शिबिराची संकल्पना व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व कलेचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिरादरम्यान क्रिकेट, बॉक्सिंग, स्केटिंग, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ यांसह योग, नृत्य, संगीत, चित्रकला, व्यक्तिमत्त्व विकास, ट्रेकिंग अशा विविध उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना व सर्जनशीलतेचा विकास झाल्याचे मान्यवरांनी नमूद केले. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी असे शिबिर महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अण्णाबाबांच्या शिक्षण व संस्कारांच्या विचारांना पुढे नेणारा हा उपक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राकेश बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमंत शिरसाठ यांनी मानले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!