तालुक्यातील तरडीजवळ सोयाबीन ट्रक पलटी; चालक बचावला  //  खत वितरणात गैरप्रकार सहन केला जाणार नाही:-विशाल मोटे,नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना  //  अण्णाबाबांच्या विचारांना क्रीडा-कलेतून अभिवादन; उन्हाळी शिबिराचा दिमाखदार समारोप  //  प्रतिकूलतेवर मात; अविनाश पावरा ‘सुपर लीग’साठी निवड  //  शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश

प्रतिकूलतेवर मात; अविनाश पावरा ‘सुपर लीग’साठी निवड

शिरपूर : जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर कुमार अविनाश कृष्णा पावरा याने यशाची उंच झेप घेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील सुपर लीग स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत मिळवलेल्या या यशामुळे शिरपूर परिसरात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सांगवी ते शिरपूर असा दररोजचा वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास करत अविनाशने सरावाची कास कधीही सोडली नाही. मर्यादित साधने, आर्थिक अडचणी आणि विविध अडथळ्यांवर मात करत त्याने आपल्या क्रिकेट स्वप्नाला आकार दिला. या संघर्षमय प्रवासातून त्याने युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
किसान विद्या प्रसारक संस्थेचे क्रीडा प्रमुख व कर्मवीर क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक प्रा. राकेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाशने खेळात सातत्याने प्रगती केली. तडाखेबाज फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि चपळ यष्टीरक्षण अशा अष्टपैलू खेळामुळे त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तब्बल आठ वर्षांनंतर धुळे जिल्हा संघ सुपर लीगसाठी पात्र ठरला असून अविनाश त्या संघाचा सदस्य आहे.
त्याच्या निवडीबद्दल धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, विशेष सल्लागार मा.आ.राजवर्धन कदमबांडे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे तथा कर्मवीर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रितेश पटेल, सर्व पदाधिकारी व निवड समिती सदस्य यांनी त्याचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण व आदिवासी भागातील प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, याचे जिवंत उदाहरण अविनाश असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!