शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश  //  शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे  //  धुळे जिल्हा क्रिकेट संघाच्या 16 वर्षाखालील संघाची दिमाखदार कामगिरी   //  आमदार अमरिशभाई पटेल यांची दूरदृष्टी ठरली जलक्रांतीची दिशा…!  //  शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य

शिरपूर : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित तांडे येथील मुकेशभाई आर. पटेल मुलामुलींची सैनिकी शाळेच्या खेळाडूंनी जिल्ह्यात पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात वर्चस्व कायम राखले आहे. सदर स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य दिनेशकुमार राणा यांचे मार्गदर्शन लाभले.

धुळे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने सब-ज्युनिअर मुले मुलींच्या जिल्हा संघ निवड चाचणी व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा शुक्रवार दि. २४ एप्रिल शनिवार ते २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी क्युमाईन क्लब, धुळे येथील संघटनेच्या मैदानावर उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण ६ संघांनी सहभाग नोंदविला.मुकेशभाई पटेल मुला-मुलींची सैनिकी स्कूलच्या संघाने स्पर्धेत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. पहिल्याच सामन्यात त्यांनी एचएसए क्लब, धुळे यांचा ३९–२४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत क्युमाईन क्लब (धुळे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन) संघावर ३६–२८ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात मुकेशभाई आर. पटेल मिलिटरी स्कूल व मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूल यांच्यात रंगतदार लढत झाली. या सामन्यात मिलिटरी स्कूलने २४–१८ अशा फरकाने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्यपद पटकावले.स्पर्धेनंतर जिल्हा संघासाठी चार खेळाडूंची निवड करण्यात आली असून आयुष नितीन सोनगिरे, मितेश शशिकांत चौधरी, प्रतीक दिनेश शिवदे व हिमांशू किरण पाटील यांची निवड झाली आहे.निवड झालेले खेळाडू दि. ३ मे ते ८ मे २०२६ दरम्यान सातारा येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

विजयी संघाचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शालेय संचालिका गिरिजा मोहन, प्राचार्य दिनेशकुमार राणा, क्रीडा संचालक किरण आंचन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करण्यात केले.या यशासाठी प्रशिक्षक विकाश बिष्ट, क्रीडा समन्वयिका डॉ. ज्योत्स्ना जाधव, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर माळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!