हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी

शिरपूर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार व खूनप्रकरणी तसेच चाकण येथे साडेतीन वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केल्याच्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर येथे सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, शिरपूर शहरातील एका खासगी दवाखान्यात गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान कापडासदृश्य वस्तू रुग्णाच्या पोटात राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या सर्व घटनांचा निषेध करत संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच दोषी डॉक्टरांना तात्काळ अटक करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेसी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहे.
यावेळी मनोज पावरा, कैलास पावरा, शिवाजी पावरा, लकी पावरा, किस्मत पावरा, बजाऱ्या पावरा, मुराज्या पावरा, नरेश पावरा, विजय पावरा, सरलाबाई पावरा, कैलास लकड्या पावरा, जगदीश पावरा, ज्ञानेश्वर मोरे आदी उपस्थित होते. टीम बिरसा आर्मी व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!