हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

शिरपूर : तालुक्यातील साम-यापाडा येथील २५ वर्षीय तरुणीचा बाळंतपणानंतर अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,सामऱ्यापाडा येथील माहेरी आलेली आरती दिलीप पावरा वय २५ हि ४ मे रोजी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास घरी बाळंतपण झाली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीयांनी तातडीने तिला खासगी वाहनाने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पहाटेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले.उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पहाटे सव्वा 5 वाजेच्या सुमारास आरती पावरा या महिलेस मृत घोषित केले.याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून शवविच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात सदर मृतदेह हलविण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

IMG_20260503_20102276
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!