हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे

शिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे रस्त्यावर रविवारी दुपारी प्रवासी रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथून प्रवासी घेऊन बाळदे येथे जात असलेली (एमएच १८ डीएल २६५७) क्रमांकाची रिक्षा दुपारी चारच्या सुमारास साकवद गावाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे रिक्षा रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला.
या अपघातात सुदाम आसाराम भिल हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ संतोष नारायण तिरमले व इतर प्रवाशांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!