हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

शिरपूर : पोटदुखीच्या त्रासावर उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोटात कापडासारखी परकी वस्तू राहिल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरपूर तालुक्यातील वाकपाडा येथील ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, १२ ऑगस्ट २०२४ रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांनी पतीसह खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तपासणीनंतर गर्भपिशवीचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, काही महिन्यांनंतर पुन्हा तीव्र वेदना सुरू झाल्याने संबंधित डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगत सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक अडचणीमुळे पुढील उपचार न करता त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात तपासणी केली असता, पोटात कापडासारखी वस्तू असल्याचे उघड झाले.
यानंतर धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. या निष्काळजीपणामुळे जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!