हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बिजासन घाटात पुन्हा भीषण अपघात; चार वाहनांची साखळी धडक, दोन जखमी

शिरपूर/- तालुक्यातील अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात गुरुवारी पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. बिजासन चौकीसमोर भरधाव ट्रेलरने पुढे चाललेल्या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात एक मिनी ट्रक उलटला असून दोन जण जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेला ट्रेलर अचानक नियंत्रणाबाहेर गेला. त्याने प्रथम एका मिनी ट्रकला धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की संबंधित मिनी ट्रक रस्त्याच्या रेलिंगवर जाऊन आदळला व उलटला. त्यानंतर ट्रेलरने एमपी 07 जीए 5019 क्रमांकाच्या दुसऱ्या मिनी ट्रकसह एका स्कॉर्पिओलाही धडक दिली.
अपघातानंतर घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच बिजासन पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चौकी प्रभारी रोहित पाटीदार यांनी तातडीने दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ट्रेलरमधील माल रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीवर काही काळ अधिक परिणाम झाला.


अपघातांची मालिका कायमच
बिजासन घाटात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.


सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी
बिजासन घाटात गणेश घाटच्या धर्तीवर तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. रस्त्याचे रुंदीकरण, वेगमर्यादा नियंत्रण, सूचना फलक व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!