हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

नरेगाचा तांत्रिक सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात, २० हजारांची लाच पडली महागात

धुळे (प्रतिनिधी) जिल्ह्यातील साक्री पंचायत समिती येथील रोजगार हमी योजनेच्या तांत्रिक सहाय्यकास २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.नितीन नारायण वारकर,वय 52,कार्यरत पं.स.साक्री रा.बाहुबली नगर, प्लॉट नं.52, साक्री रोड,धुळे असे लाचखोर तांत्रिक सहाय्यकाचे नाव आहे.या कारवाईमुळे साक्री/शिरपूरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.संशयीत वारकर हा शिरपूर पं.स.मध्ये देखील कार्यरत होता.त्यांच्याच काळात नरेगासंदर्भात बीडीओ कासोदेचे प्रकरण निघाले होते अशी माहिती समोर येत आहे.
संशयीत लाचखोर साक्री येथील पंचायत समितीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात तांत्रिक सहाय्यक म्हणून कामकाज पाहत होते.दरम्यान तक्रारदाराच्या शेतात विहीर मंजूर असून तीच्या थकीत अनुदानासाठी संशयीत तांत्रिक सहाय्यक वारकर यांच्याशी संपर्क साधला.दरम्यान वारकर यांनी लाभार्थ्यांकडून 10 टक्केप्रमाणे कमिशन 15 हजार लाचेची मागणी केली मात्र तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.दाखल तक्रारीची पडताळणी करून पथकाने सापळा रचला असता तडजोडीअंती तक्रारदाराकडून 10 हजार रुपये स्वीकारताना वारकर यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल यांच्यासह पथकातील कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांनी केली

IMG_20260319_082558
IMG_20260319_082558
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!