हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अमळनेर तहसीलदारांच्या नावाने ५० हजारांची लाचेची मागणी; दोघांना रंगेहाथ पकडले

धुळे, (प्रतिनिधी) तहसीलदारांच्या नावाने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवार (दि. २७) रोजी अमळनेर तालुक्यात करण्यात आली.
रामराव हरचंद पाटील (वय ६४, रा. लोणपंचम, ता. अमळनेर, जि. जळगाव) व जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. मु. दाडी, पो. शिरसाळे, ता. अमळनेर, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतूक व्यवसाय असून, त्यांच्या दोन ट्रॅक्टरसाठी माळवड येथील पाझरा नदीतून वाळू वाहतूक करण्यासाठी परवानगी आवश्यक होती. यासाठी खासगी इसम रामराव पाटील व जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे तहसीलदारांच्या नावाने प्रत्येकी २५ हजार रुपये, अशा एकूण ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीची पडताळणी २८ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यावेळी दोघांनी तहसीलदारांच्या नावाने ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून २५ हजार रुपयांची पहिली हप्ता रक्कम स्वीकारताना जितेंद्र पाटील याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळेचे पोलिस उपअधीक्षक सचिन सांखळे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलिस निरीक्षक यशवंत बारसे पोहेक्का. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, पोकॉ. जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय अथवा निमशासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा खासगी व्यक्ती शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ धुळे विभागाशी संपर्क साधावा.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!