हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; 28 एप्रिल रोजी मतदान

शिरपूर : तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून माघारीनंतर 8 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच 3 ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने त्या ठिकाणची सदस्यपदे रिक्त राहिली आहेत.
उर्वरित 5 ग्रामपंचायतींसाठी 4 सरपंच पदे व 1 सदस्य पदासाठी 14 वॉर्डांमध्ये सोमवार, 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मतदान अधिकारी, 3 सहाय्यक अधिकारी आणि 1 शिपाई अशा एकूण 5 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान यंत्रे व आवश्यक साहित्यांसह हे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात संबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाले.
सरपंच पदासाठी तऱ्हाड कसबे, खर्दे बु., पनाखेड आणि चांदसे-चांदसुर्या या ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. तर भोईटी ग्रामपंचायतीतील एका सदस्य पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार महेंद्र माळी, नायब तहसीलदार पंकज मगर, अव्वल कारकून सागर सोनवणे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे लक्ष ठेवून आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून मतदारांमध्येही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

IMG_20260427_23273335
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!