हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बोरविहीर-नरडाणा रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; योग्य मोबदला व नोकरीची मागणी

धुळे (प्रतिनिधी) – पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचनेनुसार बोरविहीर-नरडाणा रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे जिल्हाधिकारी सौ. भाग्यश्री विसपुते मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत शेतकऱ्यांनी एकमुखाने आपली भूमिका मांडत सांगितले की, आमच्या किमती जमिनी हेच आमच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. आम्हाला रेल्वे मार्गाला कोणताही विरोध नाही, मात्र आमच्या जमिनींना योग्य व चांगला मोबदला मिळावा, तसेच आमच्या मुलांना रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्याय्य निर्णयाची अपेक्षा व्यक्त करत प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या कुटुंबांचे भवितव्य सुरक्षित करण्याची मागणी केली.
यावेळी धुळे प्रांत श्री.कुवर साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य अरुण पाटील, भास्कर आण्णा देसले, विश्वासराव देसले, संजय पाटील, बोढरे सर, आनंदा देसले, शामकांत बडगुजर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.बैठकीस डॉ. सिद्धार्थ संजय सिसोदे, उपाध्यक्ष कै. म.दि. सिसोदे महाविद्यालय, नरडाणा यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!