हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ; जुने भामपूर येथून पल्सर दुचाकी लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरपूर :- तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दुचाकी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जुने भामपूर येथे घराच्या अंगणातूनच अज्ञात चोरट्यांनी बजाज कंपनीची पल्सर दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली असून,पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याबाबत रविंद्र नाना पाटील वय 48, व्यवसाय शेती, रा. जुने भामपूर, ता. शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या घराच्या अंगणात बजाज कंपनीची MH-18-CD-9294 क्रमांकाची काळ्या रंगाची पल्सर दुचाकी हँडल लॉक करून उभी केली होती.मात्र,10 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता बाथरूमसाठी बाहेर आल्यानंतर अंगणात सदर क्रमांकाची 50 रुपये किमतीची दुचाकी दिसून आली नाही. परिसरात तसेच गावात शोध घेतला, मात्र दुचाकीचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.विशेष म्हणजे, घराच्या अंगणातूनच दुचाकी चोरी होणे ही गंभीर बाब मानली जात असून, ग्रामीण भागात चोरट्यांचे मनोबल किती वाढले आहे याचे हे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
“चोर मोकाट आणि पोलीस केवळ कागदी तपासात व्यस्त” अशी टीका ग्रामस्थांमधून होत आहे. रात्रीची गस्त, संशयितांवर लक्ष आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा पूर्णपणे अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीबी पथकाचे पोहेकॉ अतुल पाटील करीत आहेत. मात्र, चोरीचा छडा लागणार का, की ही फाईलही इतर गुन्ह्यांप्रमाणे धूळ खात पडणार, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!