हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मुंबई–आग्रा महामार्गावर भीषण अपघात : दोघांचा जागीच मृत्यू

शिरपूर : मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २२ एप्रिल) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. आयशर मालवाहू वाहनाने उभ्या असलेल्या खाजगी प्रवासी वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली.

या अपघातात मनीषा राजेंद्र पाटील (वय ४६, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) व बंटी किशन जाधव (वय ३२, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहून हिसाळे गावाकडे जाणारे खाजगी प्रवासी वाहन महामार्गावरील हॉटेल आरतीसमोर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डी.डी. ०१ जी ९७५२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनातील मनीषा पाटील व बंटी जाधव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बस्सी यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मनीषा पाटील या लग्नकार्याच्या निमित्ताने हिसाळे येथे आल्या होत्या. तब्येत बिघडल्याने उपचारासाठी शिरपूरला येऊन परत जात असताना हा अपघात घडला. त्या नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या भगिनी होत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!