हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बबनराव चौधरी यांची भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा प्रभारीपदी निवड

शिरपुर : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी दि. 21 एप्रिल 2026 रोजी जिल्हा प्रभारी यांची निवड जाहिर केली असुन त्यात नंदुरबार भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी (शिरपुर) यांची नियुक्ती जाहिर केली आहे. हि नियुक्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने ‘नंदुरबार जिल्हा प्रभारी’पदी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, ही जबाबदारी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याची, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्याची आणि जनते पर्यंत विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याची महत्त्वाची संधी आहे. आपल्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास असल्याचे म्हटले आहे. बबनराव चौधरी हे गेल्या 46 वर्षापासुन भारतीय जनता पार्टीत काम करीत आहेत. त्यांनी 6 एप्रिल 1980 मध्ये भाजपा स्थापना दिवशी मुंबईत सहभाग घेतला होता. बबनराव चौधरी यांनी पक्षात 46 वर्षात विविध जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. धुऴे भाजपा जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष अश्या अनेक पदांवर काम केले आहे. यापुर्वी 2021 ते 2023 प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन काम करीत असतांना नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणुन यशस्वी जबाबदारी संभाऴली होती. आता परत भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी त्यांचावर नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणुन जबाबदारी सोपवली आहे. बबनराव चौधरी यांची या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!