शिरपूर : ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि आपल्या परिसरातील समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवण्याचे कौशल्य त्यांच्यात विकसित व्हावे, या उद्देशाने खंबाळे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहा दिवसीय ‘रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेमसेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन २० एप्रिल रोजी मुख्याध्यापक नितीन चौधरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या दहा दिवसांच्या प्रशिक्षण काळात सहभागी ६० विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील विविध विषयांचे सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यात प्रामुख्याने
बेसिक रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रोबोट्सची रचना आणि कार्यपद्धती–मशीन लँग्वेज: यंत्रांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असणारी भाषा,सेन्सर तंत्रज्ञान- विविध प्रकारचे सेन्सर्स आणि त्यांचा व्यवहारिक वापर,इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट:- मूलभूत इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ओळख व हाताळणी यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत प्रथमेश माळी, मंदार पाटील, संकेत देवरे आणि अतुल बोरसे हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करत आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने मॉडेल तयार करण्यावर या शिबिरात भर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी या १० दिवसांत तयार केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे आणि रोबोटिक मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन २९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक जी. डी. शिवदे, दीपक राजपूत आणि के. बी. शिरसाळे हे विशेष परिश्रम घेत आहेत.उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक नितीन चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे खंबाळे परिसरात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.