हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खंबाळे येथे ‘रोबोटिक्स व एआय’ समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरपूर : तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि स्थानिक समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवण्याचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने येथील खंबाळे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)’ या विषयावरील दहा दिवसीय समर कॅम्प सुरू करण्यात आला आहे. स्टेमसेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन २० एप्रिल रोजी मुख्याध्यापक नितीन चौधरी यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात ६० विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांना बेसिक रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, मशीन लँग्वेज, सेन्सर तंत्रज्ञान तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ओळख व वापर यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः मॉडेल तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला असून ‘करून शिकणे’ या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.
प्रथमेश माळी, मंदार पाटील, संकेत देवरे व अतुल बोरसे हे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करत आहेत. शिबिराच्या अखेरीस २९ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटिक मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी शिक्षक जी. डी. शिवदे, दीपक राजपूत व के. बी. शिरसाळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या कॅम्पमुळे खंबाळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल लक्षणीय उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!