शिरपूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन बैठक राजगोपाल भंडारी हॉल येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीत शिक्षण मंत्री आमदार अमरीश पटेल तसेच आमदार काशीराम पावरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दौऱ्याचे महत्त्व आणि विकासकामांची माहिती दिली. आगामी कार्यक्रम सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडावा, यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, शिसाका चेअरमन माधवराव पाटील यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्घाटन होणार असून, त्यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सज्ज असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.