हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

फोन न केल्याच्या कारणावरून संताप; पतीकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या

शिरपूर (प्रतिनिधी) : अत्यंत किरकोळ कारणावरून घडलेल्या धक्कादायक घटनेत खैरखुटी (ता. शिरपूर) येथे पतीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सायमल पावरा (वय 30) हा काही दिवसांपासून बाहेरगावी होता. दरम्यान, त्याची पत्नी ललिता सुनील पावरा (वय 25) हिने त्याला फोन का केला नाही, या कारणावरून घरी परतल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात सुनील पावरा याने घराजवळील दगड उचलून पत्नीच्या डोक्यात मारला.
या गंभीर मारहाणीत ललिता पावरा हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 अन्वये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुनील पावरा यास तत्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे खैरखुटी गावात भीतीचे वातावरण पसरले असून, क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!