हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आढे येथे निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या बांधकामास प्रारंभ; आ. काशीराम पावरा यांच्या हस्ते भूमिपूजन

शिरपूर : तालुक्यातील जुने आढे गाव येथे श्री निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या नवीन बांधकामासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशातील झाशी येथील १००८ अग्नी आखाड्याचे महामंत्री सोमेश्वरानंदजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले. कुरखळी येथील पुरोहित हर्षल फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले.
यावेळी कृ. उ. बा. स. संचालक शांतीलाल जमादार, उद्योजक अशोक डेमराणी, पोलीस पाटील राजकिरण राजपूत, विकासो चेअरमन दगडू पाटील, शिरपूर वकील संघाचे सचिव निलेश चव्हाण, विकासो उपचेअरमन सुधाम पाटील, माजी उपसरपंच सुनील पवार यांच्यासह गावातील विविध समित्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील भक्तगणांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. नवीन मंदिर उभारणीमुळे परिसरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरणाला अधिक चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!