हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात चोरट्यांचा घरासमोरून स्कॉर्पिओ केली लंपास, पोलिसांना खुलं आव्हान ?

शिरपुर : शहरातील वरझडी रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांना खुलं आव्हान देत घरासमोर उभी असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ कार रात्रीच्या अंधारात लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजयकुमार कांतीलाल प्रजापती (वय ३८, रा. अंजार, गुजरात) हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. १४ एप्रिल रोजी ते सुरतहून इंदूरकडे जाण्यासाठी निघाले असताना रात्री सुमारे ११ वाजता शिरपुरातील वरझडी रोडवरील एका घरासमोर त्यांनी महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. MH 12 VV 0764) पार्क केली. वाहन व्यवस्थित लॉक करून ते घरात झोपले.
मात्र, पहाटे ४.३० वाजता बाहेर येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही तासांपूर्वी उभी असलेली स्कॉर्पिओ गायब झाली होती. परिसरात शोधाशोध करूनही वाहनाचा मागमूस न लागल्याने अज्ञात चोरट्यांनीच ती चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
सुमारे ५ लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची ही स्कॉर्पिओ चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भरवस्तीतून एवढ्या सहजतेने कार चोरीला जाणे ही गंभीर बाब मानली जात असून, पोलिसांच्या गस्त व सुरक्षाव्यवस्थेवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र आखडमल करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!