हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

जॉबच्या बहाण्याने लाखोंचा गंडा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

शिरपूर : नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना, शिरपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या एका टोल मॅनेजरला मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन जणांनी तब्बल ७ लाख ८२ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी निमझरी रोड परिसरात राहणारे कल्पेश अशोक वाघ यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सागर भाऊसाहेब बोरसे आणि त्याचा साथीदार श्रीकांत गीते यांनी विश्वास संपादन करून नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. आकर्षक पगार, खात्रीशीर नियुक्ती आणि लवकर जॉइनिंग असे गाजर दाखवत त्यांनी वाघ यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले.
१३ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत संशयितांनी रोख रक्कम तसेच ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून एकूण ७.८२ लाख रुपये घेतले. सुरुवातीला नोकरी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत विश्वास निर्माण करण्यात आला; मात्र कालांतराने संशयितांनी टाळाटाळ सुरू केली. नोकरीबाबत कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने आणि संपर्कही टाळला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर वाघ यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या नोकरीच्या आमिषांना बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!