शिरपूर :- तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एकूण 4 सरपंच व 13 सदस्य अशा 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.यासाठी मुदतीअखेर सरपंच पदासाठी 19, तर सदस्य पदासाठी 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते.मात्र, 3 ग्रामपंचायतींतील 4 जागांसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याचे समोर आले. 15 एप्रिल रोजी झालेल्या छाननीदरम्यान सरपंच पदाचा 1 अर्ज बाद ठरला. त्यानंतर सरपंच पदाचे 18 व सदस्य पदाचे 13 अर्ज वैध घोषित करण्यात आले.

17 एप्रिल रोजी झालेल्या माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, सरपंच पदासाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सदस्य पदासाठीही 11 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.आता उर्वरित 4 सरपंच पदांसाठी 11 उमेदवारांमध्ये त्यात तऱ्हाड कसबे ग्रामपंचायत आमनेसामने 3 ग्रामपंचायत मध्ये दुरंगी तिरंगी लढत रंगणार आहे तर एका सदस्य पदासाठीही निवडणूक होणार आहे. मतदान 28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. तर मतमोजणी 29 एप्रिल रोजी होऊन त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी ही माहिती दिली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.