हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या — शिरपूर फर्स्टचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिरपूर तालुक्यात जानेवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिरपूर फर्स्ट’ व शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, जानेवारीत झालेल्या गारपीटीत अनेक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले होते. पंचनाम्यांची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झालेली नाही. तसेच थकीत पिक विम्याची रक्कमही त्वरित देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, २ एप्रिल रोजी शिरपूर तालुक्यातील सुमारे ३० गावांमध्ये अवकाळी पावसामुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांनाही वाढीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना कार्यकर्त्यांनी मका, केळी आणि कांदा घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सात दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास शिरपूर तालुका व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!