शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार काशिराम (दादा) पावरा यांचा 61 वा वाढदिवस बुधवारी (दि. 15 एप्रिल 2026) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिरपूर येथील आमदार संपर्क कार्यालयात विविध मान्यवरांनी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी धुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष तथा वाघाडीचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार,रविंद्र भोई, मुबीन शेख, महेंद्र पाटील, संजय पाटील,जितेंद्र पाटील, रफिक तेली, राजेश्वर शिवदे, राजुलाल मारवाडी, नंदू माळी यांनीही यावेळी आमदार पावरा यांचा सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना बबनराव चौधरी यांनी सांगितले की, “सामान्य कुटुंबातून पुढे येत सरपंच पदापासून आमदारपदापर्यंतचा काशिराम पावरा यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.” तसेच त्यांनी आमदार पावरा यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत त्यांच्या सार्वजनिक कार्याला पुढेही यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.