हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मुकेश आर.पटेल सीबीएसई स्कूलची १० वीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम

शिरपूर : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई, संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

या निकालात आरुषी आशिष अग्रवाल हिने ९७ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. यशवर्धनसिंग गोकुळसिंग राजपूत याने ९६.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, दिया गिरीश भागवानी ९५.८० टक्के व रणवीर प्रीतमसिंग चव्हाण यांनी प्रत्येकी ९५.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच खेमचंद मनोहर हिवराळे ९५.६० टक्के, रविनंदन मनोज पाटील ९५.२० टक्के, नील उल्हास देसले ९२.४० टक्के, झलक अजय भट ९० टक्के, युगांत मनेश बच्छाव ९० टक्के, आर्यन हितेश जैस्वाल याने ८९.६० टक्के गुण मिळवले आहेत. सीबीएसई १० वी च्या निकालात १० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. आरुषी अग्रवाल हिने इंग्रजी विषयात ९९ गुण, हिंदी व विज्ञान विषयात ९७ गुण व गणित विषयात ९५ गुण मिळवले आहेत. मराठी विषयात खेमचंद हिवराळे व पार्थ पाटील या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० गुण मिळवले आहेत, सामाजिक शास्त्रात दिया भाग्वानी हिने ९७ गुण मिळवले आहेत. तर आयटी या विषयात रणवीर चव्हाण व यशवर्धन राजपूत या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९९ गुण मिळवले आहेत.  या यशाबद्दल एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, स्कूल डायरेक्टर गिरीजा मोहन, प्राचार्या श्रीमती मंजु सिंह यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!