शिरपूर : प्रतिनिधी /- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत शिरपूरात आयोजित “संवाद सत्रात” तालुक्यातील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. हिरा पावरा व अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्री उईके यांना प्रत्यक्ष सादर केले.


मंत्री उईके यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांमार्फत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.