हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यात जनगणना २०२७ पूर्वतयारीला वेग; फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण संपन्न

धुळे : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जनगणना २०२७ प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात घरगणना टप्पा अचूक व प्रभावीपणे राबविण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे तीन दिवसीय व्यापक प्रशिक्षण नुकतेच पार पडले. दि. ६ ते ८ एप्रिल दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रशिक्षणात जिल्ह्यातील विविध भागांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.येणाऱ्या दि. १६ मे ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या घरगणना व कुटुंब गणना मोहिमेच्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात एकूण ३७ फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात आले.
शिरपूर तालुक्यातून शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचलित पांडू बापू माळी विद्यालयाचे एस.बी. पवार, निलेश पाटील, संजय माळी तसेच पटेल विद्यालयाचे गजानन पाटील यांची फिल्ड ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली असून त्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणासाठी धुळे महानगरपालिका जनगणना विभाग प्रमुख रवीकिरण पाटकरी आणि सांख्यिकी विभागाच्या उपसंचालक श्रीमती ममता हटकर यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय शिरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांचे सहकार्य लाभले.मुंबई येथील पार्थ पहाड यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया पार पडली. समारोप प्रसंगी उपजिल्हाधिकारी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जनगणना कार्य अचूक, पारदर्शक आणि जबाबदारीने पार पाडण्याचे आवाहन केले.प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिककर, भामरे तसेच ऑपरेटर गौरव महाजन, आसिफ, प्रतीक व शंकर यांनी मोलाचे योगदान दिले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!