शिरपूर : तालुक्यातील पळासनेर येथे दि. १ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कन्या व फाऊंडेशनच्या संचालिका सौ. द्वेता पटेल नथवानी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
या कार्यक्रमास स्त्रीरोग तज्ञ डॉ. ललिता पवार, फाऊंडेशनच्या समन्वयक सौ. सोनिया भसीन, स्वीय सहाय्यक योगेश्वर माळी, गटनेते छोटू कोळी, उपसरपंच कैलास पावरा, सामाजिक कार्यकर्ता सुभाष शिंदे, योगेश माळी, शिवाजी चारण, प्राथमिक आरोग्य केंद्र वकवाड येथील कर्मचारी, लॅब तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समन्वयक सौ. सोनिया भसीन यांनी फाऊंडेशन मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती महिलांना दिली. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, संतुलित आहार घ्यावा, कोणताही आजार दुर्लक्षित करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात एकूण ३७ नवीन महिला व मुलींची तपासणी करण्यात आली. तसेच मागील शिबिरातील २३ महिलांची फॉलोअप तपासणीही करण्यात आली. किशोरवयीन मुलींना आरोग्य व आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीत विविध आजारांचे निदान करण्यात आले असून गरजू महिलांना मोफत औषधेही देण्यात येणार आहेत.
अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशन तर्फे यापूर्वीही पळासनेर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून भविष्यातही सातत्याने असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.