हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बसस्थानकात अचानक प्रकृती बिघडल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिरपूर : शहरातील बसस्थानकात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील रहिवासी उदेसिंग नरसिंग गिरासे वय ५५ हे बाहेरगावी जाऊन परत आपल्या गावी येत होते.सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास शिरपूर बसस्थानकावर उतरल्यावर त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध अवस्थेत कोसळले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर डॉ. गौरव नेवे यांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे करीत आहेत.

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!